नाही सर, मास्क घातलेला तो प्राणी कधीच डॉ. जेकिल असू शकत नाहीत. त्यांचा खून कधीच झालेला आहे
‘‘एकदा मी अचानकच अंगणातून थिएटरमध्ये शिरलो. जिन्यातल्या खोलीचं दार उघडं होतं. तो खालच्या खोलीच्या कोपऱ्यात खोकी उपसून हवं असलेलं ते औषध किंवा इतर काही शोधत होता. मी तिथं येताच त्यानं मान वर करून माझ्याकडं पाहिलं आणि किंचाळत तो जिन्याकडं धावला. मिनिटभरासाठी त्याचा अवतार मला बघायला मिळाला, पण तो आठवला की, अंगावर काटा येतो!’’.......